शिवसेनेच्या अहमदनगर उपशहरप्रमुखासह दोघांची गोळ्या घालून हत्या.
अहमदनगर.
शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. केडगावमधील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली असावा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या हत्येनंतर संतप्त शिवसैनिकांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिलत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. सध्या परिसरातील वातावरण तणावपूर्व बनले असून, जादा पोलीस कुमक पाचारण करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको केला आहे.*
*मिळालेल्या माहितीनुसार, संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केल्याचे समजते. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांवर जोरदार दगडफेकीला सुरूवात केली. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे समजते. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.*
*दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें