राज्यातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी नंबर 1, भाजपा-शिवसेना दुसऱ्या स्थानी; शहरांत व ग्रामीण भागातही आघाडीचेच वर्चस्व, युतीला धक्का! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

राज्यातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी नंबर 1, भाजपा-शिवसेना दुसऱ्या स्थानी; शहरांत व ग्रामीण भागातही आघाडीचेच वर्चस्व, युतीला धक्का!

राज्यातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी नंबर 1, भाजपा-शिवसेना दुसऱ्या स्थानी; शहरांत व ग्रामीण भागातही आघाडीचेच वर्चस्व, युतीला धक्का!
Url


मुंबई | राज्यातील महापालिकेच्या 7 प्रभाग, पंचायत समितीच्या 12 गण आणि जिल्हा परिषदेच्या 2 गटांच्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवारी घोषित झाले. एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या. त्यात राष्ट्रवादीला 6 तर कॉंग्रेसला 5 जागा मिळाल्या. भाजपा व शिवसेना युतीच्या वाट्याला ला 7 जागा आल्या. त्यात भाजपाला 5 तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. शहरांत व ग्रामीण भागातही राष्ट्रवादी व कॉंग्रेसचच वर्चस्व दिसून आले. नाशिकमधून मनसेने व कुडाळमधून नव्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने तसेच धुळ्यातून अपक्षाने प्रत्येकी एकेक जागा मिळविली. स्वाभिमान पक्षाची जागा भाजपाच्या खात्यात धरली तर त्यांना राष्ट्रवादीची बरोबरी करता येईल. *सत्तेला चिकटून राहिल्याचा फटका शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे.* शिवसेना सत्तेचा मोह सोडून सरकारबाहेर पडली असती तर त्यांचा ग्रामीण भागातील जनाधार घटला नसता. *आगामी काळात ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे मोठे आव्हान शिवसेना-भाजपासमोर असेल.*  तर शहरी भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने इतर भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधल्यास निवडणुकांच्या जंगलात भाजपाला मोठी कसरत करावी लागेल. *ग्रामीण भागात भाजपाचे वाढते वर्चस्व ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे.* 

*महापालिका*

*राष्ट्रवादी*
पुणे
उल्हासनगर

*कॉंग्रेस*
सोलापूर
अहमदनगर

*भाजप*
जळगाव (बिनविरोध)

*शिवसेना*
मुंबई

*मनसे*
नाशिक

एकूण 7
राष्ट्रवादी 2, कॉंग्रेस 2, भाजप 1, शिवसेना 1, मनसे 1

*पंचायत समिती*

*राष्ट्रवादी*
हिंगणघाट
सडक अर्जुनी
तुळजापूर
वैजापूर

*कॉंग्रेस*
आरमोरी
बिलोली
चंद्रपूर

*भाजप*
धुळे
लोहा
साक्री (बिनविरोध)

*शिवसेना*
गंगापूर

*स्वाभिमान*
कुडाळ

एकूण 12
राष्ट्रवादी 4, कॉंग्रेस 3, भाजप 3, शिवसेना 1, स्वाभिमान 1

*जिल्हा परिषद*

*भाजप*
वर्धा

*अपक्ष*
धुळे

एकूण 2
भाजप 1, अपक्ष 1

*फायनल टॅली*

एकूण जागा - 21
राष्ट्रवादी - 6
कॉंग्रेस - 5
भाजपा - 5
शिवसेना - 2
मनसे - 1
स्वाभिमान - 1
अपक्ष - 1 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें