भोकरदन येथील ग्रामिण रुग्नालयात दिड वर्षापासुन १०२ अॅंन्बुलन्स नसल्याने प्रसुती महिलांची गैरसोय,
अनेकदा जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे केले पञव्यवार,
वर्षभरात ७७४ महिलांची झालीप्रसुती ,
शे.सलिम.प्रतिनिधी : भोकरदन
भोकरदन येथिल ग्रामिण रूग्णालयात गेल्या दिड वर्षापासुन १०२ हि अॅंन्बुलन्स उपलब्ध नसल्याने प्रसुती महिलांची गैरसोय होत असुन,त्यांनी खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत असल्याचे चिञ भोकरदन ग्रामिण रूग्णालयात पाहावयास मिळत आहे.
भोकरदन ग्रामिण रूग्णालयात पिंपळगाव रेणुकाई,दानापुर,वाकडी,आन्वा,सिपोरा,आव्हाना,सोयगाव देवी,केदारखेडा,बरंजळा साबळे,तडेगाव,तांदुळवाडी,इब्राईमपुर सह ३० ते ३५ गावातील महिला प्रसुतीसाठी भोकरदन ग्रामिण रूग्णालयात येतात,या रूग्णालयात महिण्याकाठी ६० ते ६५ महिलांची प्रसुती केली जाते,या महिलांना व बालकांना आरामात घरापर्यंत सोडवण्यासाठी शासनाने १०२ ही रूग्णवाहीकेची मोफत सोय केली आहे पण भोकरदन ग्रामिण रूग्णालयात गेल्या दिड वर्षापासुन ही रूग्णवाहीका उपलब्ध नसल्याने सदरिल रूग्णांना खाजगी वाहन करून घरापर्यंत जावे लागत आहे.
सदरिल १०२ रूग्णवाहीकेसाठी अनेकदा जिल्हा शैल्स चिकित्सक यांना पञव्यवार केला पण त्यांच्याकडुन कुठलाही रिपलाय न आल्याचे डाॅ.व्यवहारे यांनी सांगितले.शासनाने जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ही सुविधा चालु केली पण ही योजना भोकरदनला महिलांना मिळतांनी दिसत नाही,१०२ गाडी नसल्याने प्रसुती महिलांना घरी जाण्यासाठी मोठी अडचण होत असुन ही १०२ रूग्णवाहीका लवकरात लवकर उपलब्ध करावी अशी मागणी महिला वर्गातुन होत आहे.
प्रतिक्रिया : आम्ही प्रसुतीसाठी स्वखर्चाने खाजगी वाहनाने आलो असुन,डाॅक्टरांनी खाजगी वाहनानेच घरी जावे लागेल असे सांगितले.तरी शासनाने जी १०२ ही रूग्णवाहीका उपलब्ध करून द्यावी जेणेकरूण गौरगरीब जनतेला यांचा लाभ मिळावा

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें