मानवत येथे केन्द्र सरकारच्या तीन तलाख विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

मानवत येथे केन्द्र सरकारच्या तीन तलाख विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चा.

मानवत येथे केन्द्र सरकारच्या तीन तलाख  विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चा.                                                                                   

url

 

मानवत / मुस्तखीम बेलदार                 
दि.१० :  केन्द्रसरकार च्या  तीन तलाक विधेयकास विरोध करण्याकरीता मानवत शहर व तालुक्यातील मुस्लिम महिलांचा मुक मोर्चा आज  दि.१० एप्रिल रोजी  सकाळी ११ वाजता बेलदार फंगशन हॉल येथुन मंञीगल्ली मार्ग होत मेनरोडावरुन तहसिल कार्यालय ईथपर्यत धडकला व या नंतर मोर्चेचे रुपांतर सभेत झाले .
मुस्लिम महीलांनी मोदी सरकारच्या  तीन तलाक विधेयक मुस्लिम मॅरेज अॅक्ट-२०१७ आणणार आहे त्या विधेयकास विरोध करण्यासाठी मानवत येथील सर्व मुस्लिम महीलांनी मुक मोर्चात सहभागी होऊन आपला विरोध आणि रोष व्यक्त केला
या मुक मोर्च्याचे आयोजन मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड  तर्फे  आयोजन करण्यात आले होते नुक्ताच झालेल्या आँल इंडिया मुस्लिम पर्सनल लाँ बोर्डाच्या बैठकीत केद्र सरकारने लोकसभेत पारीत केलेल्या शरियतच्या तीन तलाक  या कायद्याचा विरोधात रोष व्यक्त करण्यासाठि व केंद्र सरकार मुस्लिम शरीयत इस्लामी कायद्यामध्ये ढवङा ढवङ करून समस्त मुस्लिम धर्माच्या नागरिकांच्या भावना  दुखावण्याचा प्रयत्न करित असुन त्याची सुरूवात तीन तलाक पासुन करण्यात आली म्हणुन या तीन तलाकच्या कायद्याचा विरोध देशातील सर्व मुस्लिम महिला हे करित आहेत त्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर मोर्चे काढुन कायद्याचा विरोध करित आहेत या विरोधासाठी मानवत तालुक्यातील महिला एकजुट होऊन हजारोच्या संखेने सहभागी झाले होते.
या वेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत केन्द्रसरकार ला धारेवर धरले.यावेळी  सिद्दीका सालेहात बाजी, आयशा कौसर बाजी ,सय्यदा सिमा गाजी , शाहेदा बेगम, हिना बेगम, शाहीन बेगम, हिना कौसर, नौरसजहाॅ , रेश्मा खान, सलीमा बेगम, कौसर खानम, ईर्शादबी, कौसरबी, बीबी फातिमा,नाझीया परवीन आदीच्या हस्ते नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना निवेदन देण्यात आले.या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन व आभार  नौरसजहा मँडम  यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें