मानव अधिकार संघटनेच्या भोकरदन तालुका सचिवपदी शेख मुशीर यांची निवड.
शे.कलिम.भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील अनवा येथील सामाजिक कार्यकर्ते यांची मानव अधिकार संघटनेची भोकरदन तालुका सचिवपदी निवड करण्यात आली.शेख मुशीर हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व नेहमी गरिबांच्या सुख दुःखात अग्रेसर असतात त्यांच्या या कार्यामुळे जालना जिल्हा अध्यक्ष इसरार खान पठाण यांनी शेख मूशिर यांची तालुका सचिवपदी नियुक्ती केली.भोकरदन येथील मानव अधिकार संघटनेच्या कार्यलयात शेख मुशीर यांना जिल्हा अध्यक्ष इसरार पठाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले त्यांच्या नियुक्तीने भोकरदन व अनवा येथे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .यावेळी इसरार पठाण,झुबेर कुरेशी,शेर खान ,अन्सार भाई,जाहेद शेरा,कलीम भाई,अनिस नवाब आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें