आ. संगीता ठोंबरे यांची बदनामी करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी . गंगाखेड येथील बहुजनांनी दिले मुख्यमंत्री यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

आ. संगीता ठोंबरे यांची बदनामी करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी . गंगाखेड येथील बहुजनांनी दिले मुख्यमंत्री यांना निवेदन.

आ. संगीता ठोंबरे यांची बदनामी करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी .

  गंगाखेड येथील बहुजनांनी दिले मुख्यमंत्री यांना निवेदन.  
url

   गंगाखेड (प्रतिनिधी ) :--- बीड जिल्ह्यातील केज या राखीव मतदार संघातील महिला आमदार संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी करणारा भाजप चा कार्यकर्ता डॉ वासुदेव नेहरकर व दोन साथीदार यास कठोर शिक्षा करून पक्षतून तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी गंगाखेड येथे बहुजन समाजातील   नागरिक यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.                    दिलेल्या निवेदनात केज या राखीव मतदार संघातील चर्मकार महिला आमदार संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांची सोशल मीडियावर दि, 4 एप्रिल रोजी खालच्या पातळीवर जाऊन बदनामी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे महिला आमदार असुरक्षित तर सर्वसामान्य महिलेचे काय असा प्रश्न उपस्थित होतआहे . आ. संगीता ठोंबरे या चर्मकार समाजातील असल्यामुळे    हे षडयंत्र केले जात आहे असाही आरोप केला आहे आरोपी डॉ वासुदेव नेहरकर,सुशील नेहरकर, गणेश नेहरकर रा. पिसेगाव ता केज याना कठोर शिक्षा करून पक्षातून तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा बहुजन समाज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे पुढील होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा उल्लेख दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे या निवेदनावर चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अंकुश वाघमारे, वडारयोद्धा चे प्रदेश सरचिटणीस प्रभाकर घुगरे, ता.प. स. चे सचिव प्रा पिराजी कांबळे ता.प. स. चे सहसचिव आनंद शिंदे,म. अ. स. कामगार संघटना चे लिंबाजी व्हावळे, मराठवाडा परिवर्तन सेनेचे रोहिदास लांडगे,प्राचार्य संजय सावंत,प्रा वैजनाथ गायकवाड,रा.यु.का चे शहराध्यक्ष सतीश कचरे, ऍड राजेंद्र वाघमारे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष नवनाथ पाळवदे, संग्राम खोकले,संत जनाबाई पतपेढी चे सचिव भारत हत्तीआंबीरे ,भारत गायकवाड,रामराव राठोड,नागनाथ भालेराव, गोविंद खंदारे,राजू वाघमारे,दादाराव राजगुरू,बालाजी जवादे, श्याम राजगुरू  राविकुमार राईभोळे बाबासाहेब लोखंडे सह अनेक नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें