महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन व इतर सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने जालना येथे घंटानाद आंदोलन करणयात आले.
शे.अजंहर बदनापुरकर
तेज़्ज़न्युज़24 (उपसंपादक)
आज दि.७/४/२०१८ रोजी दुपारी २ ते ५ वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन व इतर सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने जालना येथे प्रचंड मोठ्या संख्येने घंटानाद आंदोलन झाले*याआंदोलनात संपूर्ण जालना जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.२००५ नंतरच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना
*जुनी पेंशन* लागू व्हावी.
आणि २३/१०/२०१७ चा *वरिष्ठवेतन श्रेणी* बाबतचा अन्यायकारक शासननिर्णय रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी *जूनी पेन्शन संघटन व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे एक शिष्टमंडळ जावून त्यांनी जिल्हाअधिकारी श्री .शिवाजीराव जोंधळे यांना निवेदन दिले.यावेळी जूनि पेन्शन हक्क संघटनचे जिल्हा अध्यक्ष श्री.ईश्वर गाढेकर,रामेश्वर पवार,येड्डपलवार मॕडम घनसावंगी तालुक्यातील प्रतिनिधी श्री.बी.एल.सावंत शिक्षक परिषदेचे उपनेते,डी.टी.पवार,एस.एन.गच्चे ,ए.एस.बडे,के.आर.वाळवटे,ए.व्हि.गोतावळे इतर पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें