भगवान परशुराम जयंती साजरी;
शेख कलीम
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 18
सिल्लोड येथे भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने सिल्लोड शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक रऊफ बागवान,राजू गौर,अॅड. संतोष झाल्टे, संजय मुरकुटे,संजय कुळकर्णी ,अनिल कुळकर्णी ,निलेश सोनटक्के,सचिन उंबळीकर,मकरंद कोर्डे,प्रदिप कुळकर्णी,अॅड. किरण देशपांडे,उमेश राजहंस,प्रमोद सुरडकर,रवि कुळकर्णी,आदित्य पाटील,कैवल्य नागपुरे,गजानन राजहंस,प्रमोद राजहंस,शेखर सोनटक्के,प्रशांत आपसेईकर,शाम सोनटक्के,रविंद्र दाणी आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें