आ बच्चु कडू करणार औरंगाबाद मनपावर *प्रहार*
औरंगाबाद- अपंगांच्या विविध योजणांची अंमलबजावणी औरंगाबाद मनपा करीत नसल्याने आ बच्चु कडू आंदोलन करणार आहेत.प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबाद तर्फे दि 18 रोजी *मनपा घेराव* आंदोलण छेडण्यात आले आसुन या अपंगांच्या आंदोलनासाठी
*प्रहार* चे संस्थापक अध्यक्ष आ बच्चु कडू हे स्वतः सहभागी होत आहे.
अपंगांचा करोडो रूपयाचा राखीव निधी औरंगाबाद मनपाकडे सन 2011/12 पासून पडून आहे. या निधीसाठी *प्रहार* ने अनेक आंदोलने निवेदने केली परंतु मनपाने दखल न घेतल्याने शेवटी आ बच्चु कडुंच्या नेतृत्वाखाली जाब विचारला जाणार आहे. या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व आघाडी व विभागाचे औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष व प्रमुख सर्वोतोपरी योगदान देणार आहेत
अपंगांच्या संपूर्ण नोंदी कराव्यात, सन 2011/12 पासून 3% राखीव निधी खर्च करावा, मनपाचे व्यावसाय गाळे अपंगांना द्यावेत, घरकुल योजणांचा लाभ द्यावा,शासकीय व कंत्राटी नोकर भरतीत अपंगांना घ्यावे, सिद्धार्थ उद्याण मध्ये मोफत प्रवेश, मनपाची सार्वजनिक शौचालये व पार्कींग व्यावस्था अपंगांना मोफत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या घेराव आंदोलनाचे आयोजण जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, संपर्कप्रमुख पारसचंद साकला ,शहर प्रमुख दत्ताभाऊ साळकर व महिला अध्यक्ष सुनिता खरात यानी केले आसुन सहभागी होण्यासाठी सचिव ज्योतिराम जाधव ,सुनील हुस्के, युवराज पाटील, उपाध्यक्ष मोहीद देशमुख, सिद्धार्थ ईंगळे, , विनायक यावलकर आदीनी आवाहण केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें