जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे साेमवारी औरंगबाद येथे उपाेषन.
सिल्लाेड दि.८(प्रतिनिधि)सामाजिक समता,बंधुत्व आणी शांतता टिकुन रहावी यासाठी औरंगबाद जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे साेमवारी(९)औरंगाबाद येथे एक दिवसाचे उपाेषन करण्यात येणार आहे.देशपातळीवर व राज्य पातळीवर भाजप सरकारने चुकीचे निर्णय घेउन सामाजीक सलाेखा नष्ट करण्याचे कट कारस्थान रचुन शांतता भंग करण्याचे काम सुरु केले आहे.यातुन समाजात तेठ निर्माण हाेत आहे.याच प्रकारातुन देशात व राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.
दाेन एप्रील राेजी भारत बंद आयाेजनात बिहार व उत्तरप्रदेशात झालेल्या दंगलीमागे केंद्रीय मंत्री आश्वीनकुमार चाैबे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे.भिमा काेरेगाव दंगलीत मराठा व दलित समाजात जानीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.यात भाजपाच्या जवळीक असलेले मिंलीद एकबाेटे व मनाेहर भिडे यांचा सहभाग स्पष्ट असतांना भाजप त्यांना वाचविन्याचा प्रयत्न करत आहे.
संघर्ष निर्माण करणे ही भाजपाची रणनिती असून शांततेला धाेका पाेहचविन्याचा हा उद्योग सुरु आहे. पसरविन्यात येत असलेला विषारी जातीयवाद धाेरनाविराेधात व पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विराेधात जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे साेमवारी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एका दिवसाचे उपाेषन करण्यात येनार असून उपाेषनास जिल्हातील सर्व काँग्रेस जनांनी माेठ्या संस्खेने उपस्थीत राहन्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
उपोषणास जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, कार्याध्यक्ष माजी आ. कल्याणराव काळे, माजी आ. नामदेवराव पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आजी - माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें