वांगी बु.येथे संस्था व वाचनालयात महात्मा फुले जयंती साजरी... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

वांगी बु.येथे संस्था व वाचनालयात महात्मा फुले जयंती साजरी...

वांगी बु.येथे संस्था व वाचनालयात महात्मा फुले जयंती साजरी...   
                                                               

आजय बोराडे.
प्रतिनिधी..सिल्लोड.
 वांगी बु.येथे जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व श्री गुरूमाऊली सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन करण्यात आले.                                      यावेळी गावातील स्वच्छता दुत पंडित बाजीराव काकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी  फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहीती देताना सांगीतले की ख-या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.
याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला आदी विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव,संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड संतोष बालोदे, उत्तम तायडे, शेख कलीम, दिपक पवार, सोमनाथ सुरडकर, रवींद्र हिवाळे,  परमेश्वर गायकवाड,सोपान गायकवाड,  धीरज गायकवाड, गजानन गायकवाड, दौलत गायकवाड, गिरजीनाथ गायकवाड, आदी गावकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें