मानवत येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

मानवत येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी .

मानवत येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.११: मानवत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने  दि.११ एप्रिल रोजी शहरातील मुख्यरस्त्याने  दुचाकी फेरी काढुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
शहरात काढण्यात आलेल्या या  दुचाकी फेरीस निळा झेंडा दाखवुन उदघाटन माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव  सार्वजनिक समितीचे अध्यक्ष नगरसेवक  राजुभैय्या  खरात, नगरसेवक अनंत भदर्गे, चंद्रकांत मगर, आशोक पंडित, दिपक ठेंगे, जनार्धन किर्तने, संपत पंडित, सत्यशील धबडगे,  रवि पंडित, नितीन गवळी, धम्मपाल सोनटक्के, नितिन गवळी, रमेश साठे, विजय खरात, महेंद्र ठेंगे, भैय्यासाहेब गायकवाड  यांची प्रमुख उपस्थिती होती.  आंबेडकर नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्याला अभिवादन करुन निघालेली ही दुचाकी फेरी गजानन मंदिर, मोंढा, नगरपालिका, बुध्दनगर, पेठ मोहल्ला, मंत्री गल्ली, कापड मार्केट, पोलीस ठाणे, बसस्थानक मार्गे  शाहु नगर येथे महात्मा फुले यांना आभिवादन करण्यात आले व नंतर या फेरीचे विसर्जन पाणीच्या टाकीजवळ करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार संपत पंडित यांनी मानले.यावेळी मोठ्यासंख्येने नागरीक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें