सोनपेठ येथे भव्य वीर माहेश्वर व बालसंस्कार शिबीर.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२१एप्रिल २०१८
सोनपेठ शहारातील श्री नंदिकेश्वर मठ संस्थान च्या वतिने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वीर माहेश्वर व बालसंस्कार शिबीराचे आयोजन करन्यात आले असुन त्याचा प्रारंभ दि.०१ मे २०१८ ते दि.०१जुन २०१८ असा उन्हाळी सुटीतील महिना भर निवासी शिबीराचा कालावधी आहे. सध्याच्या धावत्या युगात मानव धर्माने दिलेल्या धर्म संस्कारापासुन दुरावत चाललेला असुन, विरशैव लिंगायत धर्मात हे कार्य समाजगुरु व जंगमाचे आहे. परंतु ज्ञान नसल्यामुळे अथवा योग्य मार्गदर्शना अभावी पौरोहित्य करनारे जंगम या धर्मसंस्कारापासुन दुर जाऊ लागले आहेत. ही काळाची गरज पाहुन श्री नंदिकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी गेली अनेक वर्षापासुन या शिबीराच्या माध्यमातून मुलं घडवाली ती आज आपापल्या गावी पौरोहित्य कार्यास सुरुवात देखील केली आहे. अशाच नवीन-नवीन मुलांना या शिबीराच्या माध्यमातून धर्म संस्कार घडवने गरजेचे असुन १२ते १७ वयोगटातील मुलांना मोफत प्रवेश असुन लवकरात लवकर ईच्छुकांनी प्रवेश आजच करन्यासाठि संपर्क मोबाईल क्रंमाक 9865859191, 8237313944, 9373785223, 9765425916, 8235547752, 8888000832 व 8830240745 वर संपर्क साधावा तसेच सर्व समाज बांधवांनी या शिबीराचा गरजवंताला लाभ मिळऊन द्यावा असे अवाहन श्री नंदिकेश्वर मठ संस्थान चे मठाधिपती गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें