सेलुत भिमगीत संगीत रजनीस उत्स्फुर्त प्रतिसाद. ◆भिमजन्मोत्सव उत्साहात संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

सेलुत भिमगीत संगीत रजनीस उत्स्फुर्त प्रतिसाद. ◆भिमजन्मोत्सव उत्साहात संपन्न.

सेलुत भिमगीत संगीत रजनीस उत्स्फुर्त प्रतिसाद. 

◆भिमजन्मोत्सव उत्साहात संपन्न.

समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त प्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव यांच्या भिमगीत संगीत रजनी कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार 20 रोजी सायंकाळी 9 वाजता शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात या भिमगीत संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मतदार संघाचे आमदार विजय भांबळे तर स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष विनोद बोराडे तर प्रमुख अतिथी म्हणुन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस सिद्धार्थ हत्तीअंभीरे, जि. प. सभापती अशोक काकडे, विनायक पावडे, प्रा. सुनिल तुरुकमाने,माऊली ताठे, अँड. बालासाहेब रोडगे, गौतम साळवे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी आ. विजय भांबळे व सिद्धार्थ हत्तीअंभीरे यांची समायोजीत भाषणे झाली. अत्यंत उत्साहपुर्ण झालेल्या या प्रबोधनात्मक संगीत रजनीत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव व संच यांनी शिवराय व भिमराय यांच्यावर अधारीत गीते सादर करण्यात आली. यामध्ये दोनच राजे इथे जाहले, इथल्या पुण्यभुमीवर,ज्याचा जगात गाजावाजा भिमराव एकच राजा, भिमराज की बेटी मै तो जयभिम वाली हुं, माझ्या भिमाच्या नावाच कुंकु लावील रमानं, असे अनेक गीते गाऊन महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रवि भदर्गे तर अशोक पाईकराव यांनी अभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक गौतम साळवे,अशोक पाईकराव, सचीन शिंदे, पप्पु शिंदे, गोटु धापसे, विशाल धापसे संजय भाग्यवंत, बाळु डंबाळे, बाबा भदर्गे आदींनी पुढाकार घेतला. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें