शिक्षणातूनच सर्वप्रकारचे दुष्काळ निवारण्याचे भान निर्माण होईल - पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

शिक्षणातूनच सर्वप्रकारचे दुष्काळ निवारण्याचे भान निर्माण होईल - पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने.

शिक्षणातूनच सर्वप्रकारचे दुष्काळ निवारण्याचे भान निर्माण होईल - पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने.


पठाण अजमत/ जिंतूर
        आज विविध सामाजिक प्रश्न उभे राहत आहेत.अस्मानी व सुलतानी संकटातून समाज जात आहे. प्रयत्न हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे म्हणून शिक्षणातूनच सर्वप्रकारचे दुष्काळ निवारण्याचे भान व जान निर्माण होईल, असे प्रतिपादन पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले.
        जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षण दिनक्रम सुकर व्हावा, यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह उभारण्यात येणार असून या वसतिगृहाचे भूमिपूजन शक्रवार दि.१३ एप्रिल रोजी करण्यात आले. आगामी काळात लवकरच हे वसतिगृह उपलब्ध होणार आहे.
          जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह उपलब्ध होणार असून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रति वर्ग २० विद्यार्थी राहू शकतील अशा क्षमतेचे सुसज्ज वसतिगृह जिंतूर शहरातील गुरुदेवनगर येथे उभारण्यात येणार आहे. पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी युवकमिञ ह.भ.प.नारायण महाराज, मुकुंद सावजी कळमकर,आमदार विजय भांबळे, युवा नेत्या मेघनादिदी बोर्डीकर व शब्दसह्याद्री प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते.
           जिंतूर शहर शैक्षणिकदृष्ट्या कात टाकत आहे. एक छोटा बिंदू बनून क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह लवकरच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सुसज्ज अभ्यासिका, संगणक कक्ष, भोजनालय, कॉमनरूम, वैद्यकीय सुविधा या वसतिगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एक-दोन वर्षांत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील काळात हे वसतिगृह उपलब्ध होऊ शकेल, असे संचालक इंजि.आशा दराडे व प्रा.बाळू बुधवंत म्हणाले.
        कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्ताविक प्रा.पुरुषोत्तम सांगळे व आभार प्रा.बाळू बुधवंत यांनी मानले. कार्यक्रमास पालक, शिक्षक,डाॅक्टर, वकिल, पञकार उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें