सेलु येथील प्रिन्स अकॅडमी सीबीएसई चे घवघवीत यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 अप्रैल 2018

सेलु येथील प्रिन्स अकॅडमी सीबीएसई चे घवघवीत यश.

सेलु येथील प्रिन्स अकॅडमी सीबीएसई चे घवघवीत यश.

समशेर खान.
श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडेमी सीबीएसई सेलू च्या वर्ग दहावीच्या तीन विद्यार्थयांची  शाहू कॉलेज लातूर प्रवेश पात्रता चाचणी परीक्षे मध्ये निवड झाली .
दरवर्षी प्रमाणे शाहू कॉलेज लातूर मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता चाचणी परीक्षा २०१८ लाखो विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. या परीक्षेमध्ये प्रिन्स अकॅडेमी सीबीएसई सेलू चे विद्यार्थी अनुक्रमे श्रेयश प्रकाश पांडव(२८),मिताली विष्णुदास राठी(७१) , मयांक निर्मलकुमार काला (८९) यांची ऐईम्स प्रथम १०८ गटामध्ये निवड झाली . या यशामागे विदयार्थ्यांची मेहनत , सातत्यपूर्ण अभ्यास   प्रिन्स अकॅडेमी सीबीएसई ने चालू केलेला क्रॅश कोर्से पद्धत ,  डॉ संजय रोडगे सरांचे व  शिक्षकांचे नियोजन बद्ध पद्धतीचे मार्गदर्शन आहे . या सारख्या परीक्षा पद्धतीचे योग्य पद्धतीने सराव शाळेमध्ये घेण्यात येतो .
मुळात शाळेचे ध्येय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आहे . आज जो शिक्षणाचा बाजार चालू झालेला आहे त्या मध्ये प्रिन्स अकॅडेमी सीबीएसई या शाळेची ओळख गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे व एक आदर्श विद्यार्थी घडवणे अशी आहे . या  यशासाठी श्रीराम  प्रतिष्ठानचे अध्यक्ष  डॉ संजय रोडगे सर ,सचिव डॉ सविता रोडगे मॅडम , प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे सर , प्राचार्य वर्षा स्वरूप मॅडम , प्रा नारायण चौरे तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांनी विद्यर्थ्यांचे अभिनंदन  केले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछया दिल्या

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें