लातुर येथे चाकूचा धाक दाखवून ९० हजारांना लुटले .
प्रतिनिधी.लातुर.दि.29/04/2018.लातूर मधील विवेकानंद चौक परिसरातील ओम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिनकर भीमराव घुले यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन व्यक्तींनी घुले यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, मोबाईल आणि रोख ९ हजार असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल काढून घेतला.या प्रकरणी दिनकर घुले यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, दिनकर यांनी महेबुब खाजा शेख यांच्यासह आणखी एका व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली असून या दोघांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल काढून घेतला असे त्यांनी सांगितले आहे. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास घरात येऊन जिवंत जाळू अशी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून या घटनेची नोंदस्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीतआहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें