अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धनेगाव येथील घटना.
आरोपीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
सेलू (प्रतीनीधी )
टीव्ही दाखवतो म्हणून अल्पवयीन मुलीला दुपारी घरात घेऊन दरवाजा बंद केला व नंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार (बलत्कार ) केल्याची घटना धनेगाव येथे १३ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली असून याबाबत १७ एप्रिल रोजी दुपारी ५:१३ मी. सेलू पोलिस स्टेशन मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की भागवत दादाराव उबाळे रा.धनेगाव यांनी सेलू पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून या फिर्यादीमध्ये धनेगाव येथील अमोल भालेराव (वय २० वर्षे ) याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तू माझ्या घरी ये मि तुला टि व्ही दाखवतो आसे म्हणुन या अल्पवयीन मुलीला (वय ७वर्षे ) १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घरात घेतले व दरवाजाची कडी लावून दरवाजा बंद करून त्या मुलीची तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार (बलात्कार ) केला व याबाबत कुणालाही सांगायचे नाही जर सांगितले तर तुझी नरडी राबवून जीवे मारीन अशी धमकी दिली या फिर्यादीवरून सेलू पोलिसांनी आरोपी अमोल भालेराव यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ३७६ (२) (i) ,भांदवी कलम ३७७ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास स.पो.उ.नि.शंकर पांढरे हे करीत आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें