माथला येथील महीला पाण्यासाठी आक्रमक. सरपंचाच्या घरावर काढला घागर मोर्चा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अप्रैल 2018

माथला येथील महीला पाण्यासाठी आक्रमक. सरपंचाच्या घरावर काढला घागर मोर्चा .

माथला येथील महीला पाण्यासाठी आक्रमक.

#सरपंचाच्या घरावर काढला घागर मोर्चा .

@स्थानीय प्रशासन मात्र झोपेत.


कौसडी प्रतिनिधी..
जिंतुर तालुक्यातील माथला येथील महिलांचा पाण्यासाठी सरपंचाच्या घरावर दिनांक 11 अप्रैल बुधवार रोजी धडक मोर्चा  काढण्यात आले होते.
तालुक्यातील छोटेसे गाव आसलेला माथला या गावातील जेमतेम लोकसंख्या सहाशे आहे या गावात बिन वोरोध ग्रा.प.निवडली जात आहे
मागील दोन महीण्यापासुन येथील   महिलांना व पुरूषांना पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे
पुरषांना शेतातील कामे सोडुन तर महिलांना घरातील कामे सोडुन गावाच्या बाहेरून दोन की.मी.अंतरावरून दिवसभर पाणी आणावे लागत आहे या मुळे येथील महिलांचे व पुरूषांचे  हाल होतांनी दिसत आहे
मागील काही दिवसा पासुन या गावात वाॅटर सप्लाईने नळाला पाणी पुरवठा केली जात होती मात्र मागील दोन महीण्यापासुन हे वाॅटर सप्लाई बंद पडल्यामुळे येथील गावक-यांचे हाल होत  आसल्याने महीलांनी मीळुन सरपंच यांच्या घरावरच घागर मोर्चा काढला होता
या मोर्च्या मध्ये आश्रुबाई राउत,लक्ष्मीबाई शिंदे,पार्वतीबाई शिंदे,रुक्मिणीबाई भोंबे,रंजनाबाई भोंबे,सुनीता भोंबे,राधा जाधव,मीरा कटारे,आशोक शिंदे,योगश भोंबे,पांडुरंग भोंबे,संतोष उकंडे,अर्जुन भोंबे यांच्यासह गावातील सर्व महिला पुरुष सहभागी होते

येत्या काहीच दिवसात अधिग्रहण करून वाॅटर सप्लाईने नळाने पुर्ण गावात पाणी पुरवाठ करण्यात येणार आसल्यांची माहीती सरपंच आम्रपाली प्रकाश अंभुरे यांनी दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें