सीड बॉल बनविन्यासाठी बिया पुरवा.
वृक्षमित्र महेश जाधव यांचे आवाहन.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२१एप्रिल २०१८
सोनपेठ तालूक्यातील शेळगांव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयाचे उपक्रमशील सहशिक्षक महेश जाधव यांनी दोन वर्षांपासून सीडबॉल बनवुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्य हाती घेतले आहे. सोनपेठ शहर व पंचक्रोशीतील सुजान नागरिक या कार्यात त्यांना मोलाचे सहकार्य करत असतात. यंदाही सीडबॉल बनवण्यासाठी लागणाऱ्या आंबा, चिंच, रामफळ, बेलफळ, करंजी, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, बदाम अशा विविध बिया सोनपेठ रहिवाशी व पंचक्रोशीतील जनतेने जमा करून ठेवाव्यात व 8805749974 या भ्रमणध्वनीवर संपर्क करून कळवावे असे आव्हान नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासचे परभणी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें