भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२१एप्रिल २०१८
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १२७व्या जयंती निमित्त तालूक्यातील  मौजे उखळी (बु.) येथे दि. २०/०४/२०१८ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आधारीत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गोवर्धन आप्पा चौधर व केंद्रप्रमुख सुरनर यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी आदर्श कृतिशील शिक्षक डी.के.पवार, शिक्षक संघटनेचे राज्यनेते सनिदेओल जाधव, म.प्रा.शि.स.चे तालुकाध्यक्ष बळीराम नाईक, उपाध्यक्ष ओमकार हवालदार, म.फुले शि.प.चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कराड आदी उपस्थिती होती.
    तालुक्यातील कोठाळा तांडा, वाणीसंगम, नखतवाडी, बोंदरगाव, लोकरवाडी येथील एकूण ६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
    तसेच स्पर्धेतील सहभागी स्पर्धकासाठी कै.श्रीराम गोंविदराव नाईक यांच्या स्मरणार्थ श्री.सुनिल पुरी सरांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे घोषीत करण्यात आला.

*वयोगट ६ते८*
प्रथम:- आकांक्षा मुजमुले उखळी बु
द्वितीय:- रोहिणी गोदाम,  उखळी बु
उत्तेजनार्थ:- पल्लवी डुकरे उखळी बु

*वयोगट ९ते११*
 प्रथम:- प्रतिक गुट्टे लोकरवाडी
 द्वितीय:- अर्पिता वाघमारे,वाणीसंगम
 उत्तेजणार्थ:-  प्रीती राठोड,कोठाळा तांडा.

 *वयोगट १२ते१४*
 प्रथम:- प्रगती मस्के उखळी बु
 द्वितीय:- प्रतिक्षा सावंत  उखळी बु.

 *वयोगट १५ते१९*
प्रथम:- गीता गुट्टे ,लोकरवाडी
द्वितीय:- समिक्षा रणखांबे ,उखळी बु.
सदरील बक्षीस समारंभात यशवंत स्पर्धकांच्या मुख्याध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
     स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भदाडे मॅडम, भावसार मॅडम व डोंगरे मॅडम यांनी काम पाहिले. तर या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिवाजी सावंत व श्री.गणेश तोडकर यांनी केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ दि.२२/०४/२०१८ रोजी स.१०:०० वाजा होईल असे शिक्षक संघटनेचे राज्य नेते सनिदेवल जाधव यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें