गटविकास अधिका-याविरोधात तक्रार दाखल.
सराटी येथील रोहयो कामांचा मोबदला देण्यात अधिका-यांकडूनच टाळाटाळ.
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 30
सिल्लोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे वैयक्तिक सिंचन विहिर रोहयो कामांचा मोबदला देण्यावरुन जाणून - बुजून हलगर्जीपणा करीत असल्याची तक्रार सराटी येथील अपंग महिला सुमनबाई हरी बुरंगे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील अपंग महिला सुमनबाई हरी बुरंगे यांना सन 2014 मध्ये ग्रामपंचायत ठरावानुसार वैयक्तिक सिंचन विहिर (रोहयो)अंतर्गत काम सुरू करण्याबाबत कार्यारंभ आदेश ही देण्यात आले. सदरील सिंचन विहिरीचे कामही सुरु करण्यात आले 2017 ते 2018 मध्ये एकुण सात मस्टर भरण्यात आले.
सदरील काम पुर्ण करण्यात आले असुन अद्यापही अकुशल कामांचा मोबदला देण्यात गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांच्याकडून हेतूपुरकर हलगर्जीपणा करण्यात येत आहे. काम पुर्ण होऊनही हलगर्जीपणा करण्यात येत असुन सदरील प्रकरणी चौकशी करुन मोबदला देण्यात यावा तसेच दोषींवर कार्यवाही करण्यात यावी असी मागणी सराटी येथील अपंग महिला सुमनबाई बुरंगे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें