अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गँभीर विरेगाव गावाजवळील घटना.
भोकरदन(प्रतिनिधी) आज सकाळी सोमवार सुमारे दहा वाजेच्या दरम्यान भोकरदन जाफराबाद रोडवरील विरेगाव नजीक प्रल्हादपूर येथील सोमिनाथ रामराव शेळके,(28) फत्तेपुर येथील रामेश्वर साहेबराव बरडे(26) यांच्या वाहनाला पाठीमागुण येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने या दोघांना जबर मार लागल्याने त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले.
व त्यांना प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले, मात्र सोमिनाथ रामराव शेळके यांचा डोक्याला मार लागल्याने त्यांचा रस्त्यात्याने मुत्यू झाला.व रामेश्वर साहेबराव बरडे.यांचावर औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की प्रल्हादपुर येथील सोमिनाथ रामराव शेळके व फत्तेपुर येथील रामेश्वर साहेबराव बरडे हे दोघेजण होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच 20सीQ.722 या गाडीवरून काही कामानिमित्त विरेगावकडे जात असताना सकाळी दहा वाजेच्या दरम्यान विरेगाव नजीक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाने
धडक दिल्याचे समजते, या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने यांना पाठीमागुण जबरदस्त धडक देऊन सदर वाहन तेथुन पसार झाले.यावेळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे. गणेश पायघन.श्री देवकर. विजय जाधव. हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र यांचं वेळी शिवसेनेचे नेते मनिष श्रीवास्तव हे पारध कडुन भोकरदन कडे येत असताना त्यांनी हा प्रकार बघितल्यावर त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अपघात ग्रस्तांना तात्काळ आपल्याचं चार चाकी वाहनात त्यांना घेऊन भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सदर घटनेतील सोमिनाथ रामराव शेळके व रामेश्वर साहेबराव बरडे. या दोघांना धकड देणारे अज्ञात वाहन पसार झाले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत
सोमिनाथ रामराव शेळके.हा मयत झाला असुन त्यास एक मुलगा .एक मुलगी.आई.पत्नी एक भाऊ .दोन बहीण.असा परिवार आहे. त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर प्रल्हादपुर येथे अंतसंस्कार करण्यात आले व रामेश्वर साहेबराव बरडे यांच्या औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें