वांगी बुद्रूक येथील जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने सिल्लोड येथील उपजिल्हा रूग्णालयात "स्वागत लेकीच्या जन्माचे"एक मुलगी एक वृक्ष" कार्यक्रम संपन्न.....
वांगी बुद्रुक येथील जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिल्लोड येथील उपजिल्हा रूग्णालयात "स्वागत लेकीच्या जन्माचे या कार्यक्रमानिमित्त"एक मुलगी एक वृक्ष" कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड तसेच श्रीमती कविता गायकवाड यांनी केले होते.
गायकवाड दांपत्य मागील पाच वर्षापासुन स्वागत लेकीच्या जन्माचे या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.
यावेळी त्यांनी वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असुन त्यामुळे आज पाणीटंचाईमुळे आपल्याला दुष्काळाचा जो सामना करावा लागत आहे ही समस्या व काळाची गरज लक्षात घेऊन गायकवाड दापंत्यानी मुलीची आठवण म्हणुन मुलीचा जन्मदीवस असो किंवा वाढदिवस प्रत्येकाने एक तरी वृक्ष गावात किंवा शेतात मुलीच्या नावाने लावुन त्याला जपावे असा मानस डोळ्यासमोर ठेऊन सिल्लोड येथील उपजिल्हा रूग्णालयात मुलीला जन्म देणा-या आई वडीलांचा संस्थेच्या वतीने एक वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला..
यावेळी शासनाच्य "लेक वाचवा लेक शिकवा"या अभियानाअंतर्गत तसेच संस्थेच्या स्वागत लेकीच्या जन्माचे" एक मुलगी एक झाड"या उपक्रमाअंतर्गत मुलीच्या जन्मदरात वाढ व्हावी स्री भृण हत्येला आळा बसुन मुलीच्या जन्मदरात वाढ व्हावी तसेत समाजात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलुन जनजागृती व्हावी या उद्देशाने मुलीला ड्रेस देऊन तीच्या आईवडीलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डाँ.श्री.बि.जी.सपकाळ हे होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ.बि.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गायकवाड यांनी सांगीतले की सदरील उपक्रम हा प्रत्येक महीन्यातील एक दिवस राबविण्यासाठी रूग्णालयाच्या वतीने लेखी परवानगी घेण्यात आली आहे.
यावेळी कवि धनंजय गव्हाले, व्याख्यायीका श्रीमती सरला अशोक कुमावत, श्रीमती कविता धनंजय गव्हाले, परिसेविका श्रीमती डाँ. एस.पि.सुरडकर, अधिपरिचारीका श्रीमती डाँ.एस.एस.जाधव, अधिपरिचारीका श्रीमती डाँ.एस.सोनवणे, अधिपरिचारिका श्रीमती डाँ. एन.निर्मळ,अधिपरिचारीका श्रीमती डाँ. व्ही.डी.कपाटे, यांच्या हस्ते मुलीला जन्म देणा-या आई वडीलांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्रीमती रूपाली पदमाकर मोरे (किन्ही), श्रीमती वैशाली संतोष बनकर (पिशोर), श्रीमती यास्मीन बानो सय्यद तालेब (औरंगाबाद) श्रीमती ज्योती राजु पायगव्हान (सुरंगळी), श्रीमती सरला शिवाजी खांडबहाले (नाशिक), श्रीमती सुषमा विकास राजपुत (बोदवड),श्रीमती सुशिला भाऊसाहेब उपडे आदींचा सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें