शिवसेनेचे राम पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पाणपोईचे उदघाटन.
अज़मत पठान.
जिंतूर प्रतिनीधी
शहरातील तहसील कार्यालया समोर शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष तथा जि प गटनेते राम नाना पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना तालुका शाखेच्या वतीने शितलजल पाणपोईचे विविध मान्यवरांच्या 12 एप्रिल रोजी उदघाटन करण्यात आले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची आवश्यक असते यासाठी नेहमी सामाजीक कामात नेहमी अग्रेसर असणारे राम नाना पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन शिवसेनेचे तालुका प्रमुख भारत पवार,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,रितेश पांडे,युवा सेना प्रमुख रमेश संगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गंगाधरराव मोरे,संदीप अंभुरे,वैजनाथ कदम,कांतराव धानोरकर,रामप्रसाद कंठाले,परमेश्वर ठोंबरे विठ्ठल राठोड, बाळू सुपारकर,आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें