मानवत येथे तहसीलदाराच्या दालनात मानोली येथील ग्रामस्थांनी केले विषप्राशन!
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१९: मानवत तालुक्यातील मानोली येथील चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मानवत तहसिल कार्यालयात आज दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्त असे मानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदाराना निवेदन दिले होते यात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी,गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,गावातील २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.या समस्या न सोडविल्यास १९ फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा निवेदनात दिला होता त्यानुसार आज सकाळी मानोली येथील ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत
लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यावेळी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय आधिकारी डॉ. नजम शेख यांनी तात्डीने रुग्णावर प्राथमिक उपचार सुरु केला व या नंतर आधीक उपचारासाठी चारही रुग्णांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे.तहसिलदार नकुल वाघुंडे रुग्णासोबत यावेळी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें