मानवत तालुक्यातील रत्नापुर जवळ भीषण अपघात.
देवकृपा ट्राव्हल्स ने विस्टा गाडिस उडवले ५ जख्मी .
मानवत /मुस्तखीम बेलदारमानवत तालुक्यातील रत्नापुर जवळ आज दि.१९ एप्रिल रोजी सध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास देवकृपा ट्राव्हल्स व विस्टाचा समोरासमोर अपघात झाला यात विस्टा गाडितील ४ व्यक्ती व लग्नासाठी बँजो वाजवणार असे पाच जन गंभीर जख्मी झाले आहे.
विस्टा गाडि नं.एम एच २० सी एच २६८७ हि गाडि बीडहुन परभणी कडे जात होती तर देवकृपा ट्राव्हल्स गाडी नं.एम एच २३ डब्ल्यु ४११३ हि लग्नाचे वराती घेऊन माजलगाव कडे जात होती यातच रत्नापुर येथे आज एक विवाह होता व गावातील नागरीक नवरीला व नवर्याला वाट लावण्यासाठी रोडावर जमा होते यात देवकृपा ट्राव्हल्स ने लग्नातील बँज वाजवणारे व्यक्तीस जोरदार धडक दिली व नियंञन सुटल्यामुळे समोरुन येणाऱ्या विस्टालाही जोरदार धडक दिली.या विस्टातील एस.बी.आय बँकेचे कर्मचारि बीडहुन परभणीकडे त्याच्या मिटिग साठी परभणीकडे जात होते.हा अपघात झाल्यामुळे संतप्त गावातील नागरिकांनी देवकृपा ट्राव्हल्स दगडफेक करुन फोडुन टाकली.या अपघातात अनंत कसबे रा.परभणी,सुरेश ससाने रा.खेर्डा ,हनुमान ढगे रा. पिंपळगाव ,प्रफुल दानी रा.परभणी व एका जख्मी व्यक्तीचे नाव कळले नाही .मानवत पोलीसानी घटनेकडे वेळीच धाव घेउन परिस्थिती नियंञात आणली असुन जख्मी ना उपचारासाठी मानवत येथील दगडु यांचे मल्टि स्पेशियालीटी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यातील बँजो वाजविनारा सुरेश ससाने यांची प्रकृती गंभीर आहे.गावातील उपसरपंच चक्रधर राजे,अमोल ताकट,रवी लगडे,महिन्दर खरात,अक्षय केदारे या युवकांनी आपघात झाल्यावर जख्मीना मदत केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें