पाळोदि येथील शेतकऱ्यांच्या कडब्याला आग लागुन ८०००० रुपयाचे नुकसान .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: मानवत तालुक्यातील पाळोदि येथील मियाँखा हबीबखा पठाण यांच्या गावालगत असलेल्या गावठाणी प्लाँट मध्ये ठेवलेल्या कडब्याच्या ५ वलाया यात ९००० कडब्याच्या गंजी आज दि.२९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कडब्याच्या गंजीला अचानक आग लागुन जळुन खाक झाले आहे यात शेतकऱ्यांचे ८० हजार रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे.
या विषयी माहितीनुसार पाळोदि येथील शेतकरी मियाँखा हबीबखा पठाण यांनी त्यांच्या शेतातील ९ हजार कडब्याच्या गंजी ५ वलईत गावालगत असलेल्या गावठाणी प्लाँट मध्ये ठेवलेल्या होत्या आज सकाळी ८ च्या सुमारास गंजीला अचानकपणे आग लागली शेजारिल व गावातील लोकानी आग विझविण्याचा आतोनात प्रयत्न केला पण आगीने बघता बघता प्रचंड पेट घेतला या नंतर पाळोदि चे सरपंच यांनी तात्डीने मानवत येथील अग्नीशमन दल व पाथरी येथील अग्नीशमन दलच्या गाड्या बोलावुन आग नियञणात आणली तो पर्यत ९ हजार कडब्याच्या गंजी जळुन खाक झाले होते यात शेतकऱ्यांचे ८० हजार रुपयाचे मोठे नुकसान झाले .या घटनेनंतर तलाठी यांनी या घटनेचा पंचनामा केला असुन नेमकी आग शॉर्टसर्किटमुळे लागली कि अन्य कारणाने लागली हे आजुनही कळाले नाही.या घटनेने शेतकरी मियाँखा हबीबखा पठाण हे धास्तावले असुन नैराश्येत आहे त्यांना आता जनावराच्या चाराचा प्रश्न भेडसावत आसुन शासनाने त्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी ते करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें