अल्जेरियन लष्कराचं विमान कोसळलं!, 257 सैनिकांचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

अल्जेरियन लष्कराचं विमान कोसळलं!, 257 सैनिकांचा मृत्यू.

अल्जेरियन लष्कराचं विमान कोसळलं!, 257 सैनिकांचा मृत्यू.

अल्जेरियाची राजधानी अल्जेरियर्स जवळ मोठी विमान दुर्घटना घडली आहे. सैनिकांना घेऊन जाणरं विमान कोसळलं आहे.  या विमान दुर्घटनेमध्ये 257 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. Il-76 हे विमान शेकडो सैनिकांना घेऊन जात होतं. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.  अल्जेरियातील बेछार या शहराकडे जात होतं त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.  स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अल्जेरियातील बोऊफरिक विमानतळाजवळ हीदुर्घटना घडली.या अपघातानंतर अल्जेरियात एकच खळबळ उडाली. सध्या प्रशासनाने तातडीचं मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे. 14 अँम्ब्युलन्स आणि 10 ट्रकद्वारे जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या घटनास्थाळवरुन विमानाचे अवशेष काढण्यात येत असून. ही दुर्घटना कशी घडली याचा शोध घेतला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें