शाहजहानची स्वाक्षरी आहे का ? ताजमहालवर मालकी सांगणा-या वक्फ बोर्डाला न्यायालयाने खडसावले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

शाहजहानची स्वाक्षरी आहे का ? ताजमहालवर मालकी सांगणा-या वक्फ बोर्डाला न्यायालयाने खडसावले.

शाहजहानची स्वाक्षरी आहे का ? ताजमहालवर मालकी सांगणा-या वक्फ बोर्डाला न्यायालयाने खडसावले. 
url

ताजमहालवर मालकी हक्क सांगणा-या उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाला सर्वोच्च न्यायालयाने संपत्ती तुमच्या मालकीची आहे हे सिद्ध करणारे शाहजहानने स्वत: स्वाक्षरी केलेली कागदपत्रं सादर करण्याचा आदेश दिला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. कागदपत्रं सादर करण्यासाठी वक्फ बोर्डला एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे. शाहजहानचा ताजमहाल बांधून झाल्यानंतर १८ वर्षांनी १६६६ रोजी मृत्यू झाला होता. आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत त्याने हा ताजमहाल बांधला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्यायालायने ताजमहाल वक्फ बोर्डाची संपत्ती आहे हे दुसरं कोणीनाही तर शाहजहानने जाहीर केल्याचा पुरावा हवा असल्याचं सांगितलं आहे. ‘ताजमहाल वक्फ बोर्डाची संपत्ती आहे हे भारतात कोणाला पटणार आहे ? अशा गोष्टींसाठी उगाच सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवत जाऊ नका’, अशा शब्दांत न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी बोर्डाला खडसावलं.२०१० मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालात धाव घेतली होती, ज्यामध्ये ताजमहाल त्यांच्या नावावर नोंदणी करण्यास सांगण्यात आलं होतं. या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली आहे.
वक्फ बोर्डाची बाजू मांडणारे वकिल व्ही व्ही गिरीयांनी शाहजहानने बोर्डाच्या नावे वक्फनामा तयार केल्याचा दावा केला. ज्याला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने विरोध केला. ‘मग तुम्ही आम्हाला शहाजहानने तयार केलेली मूळ कागदपत्रं दाखवा. त्याची सही दाखवा’, अशी विचारणा न्यायालयाने केली. यासोबतच कागदपत्रं सादर करण्यासाठी एक आठवड्याची वेळ दिली आहे. यावेळी न्यायाधीशांनी बोर्डाला काही प्रश्न विचारले. ‘शाहजहानने वक्फनाम्यावर स्वाक्षरी कशी केली ? तो जेलमध्ये बंद होता आणि तिथूनच ताजमहाल पाहत असे’, अशी शंका न्यायाधीशांनी उपस्थित केली. शाहजहानचा जुलै १६६६ मध्ये आग्रा किल्ल्यावर मृत्यू झाला होता. मुलगा औरंगजेबाने त्यांना तिथे घरकैदेत ठेवलं होतं.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें