भोकरदन येथील सिध्दांत फायबर्स जिनिंगला आग ... आगीत ८० ते ९० लाखाचे कापूस गठान व सर्किचे ढेप जळून खाक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 अप्रैल 2018

भोकरदन येथील सिध्दांत फायबर्स जिनिंगला आग ... आगीत ८० ते ९० लाखाचे कापूस गठान व सर्किचे ढेप जळून खाक.

भोकरदन येथील सिध्दांत फायबर्स जिनिंगला आग ...

आगीत ८० ते ९० लाखाचे कापूस  गठान व सर्किचे ढेप जळून खाक.


शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन सिल्लोड रोड वरील इब्राहिमपूर शिवरातील सिद्धांत फायबर्स जिनिंग व ऑइल मिलला आज सकाळी ७ ते ८ दरम्यान आग लागून त्यात जिनिगं मशनरीचे १५ ते २० लाखाचे तर कापूस गठान १५० ते २००च्या जवळ जळून खाक तर ४००ते ५०० टन सरकीचे ढेप जळल्याचे जिनिंग मालक राजेंद्र जैन यांनी सांगितले.आगीत ८० ते ९० लाखाचे कापूस गठान व सरकीचे ढेप जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे आद्द्यपी कळाले नसून .आग लागल्याचे लक्षात येताच एक जनसेवक म्हणून नगरसेवक तथा गटनेता रणवीर देशमुख व परिसरातील आजू बाजुच्या ग्रामस्थांनी आग विजवण्याचा प्रयन्त केला.मात्र ,कापूस आणि त्यात वारा असल्याने काही क्षणातच आगीने रोद्रृप धारण केले होते.याबाबत माहिती मिळताच  भोकरदन शहरातील अग्निशमन  दलाच्या जवानांनी तातळीने घटनास्थळी धाव घेतली. गाडीच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भंयकर होती कि लवकर  आग आटोक्यात येत न होती.नंतर जालना येथील अग्निशामन गाडीला बोलावण्यात आले होते तरीपण संध्याकाळ पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी दोन्ही अग्निशामन गाडीच्या कर्मचाऱ्यांनी प्रयन्त केला.पण आग आटोक्यात आली न होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें