मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 अप्रैल 2018

मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग.

मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग.
संग्रहित


पुणे  - शहरात आगीच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज शनिवार (दि.२१) रोजी सकाळी मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. या आगीचे भयानक स्वरूप पाहता अग्निशामक दलाच्या तब्बल १४ गाड्या आणि १३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी मार्केटयार्ड येथील बाबासाहेब आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाला याबाबतची माहिती तात्काळ देण्यात आली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहता पुणे अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी २ जेसीबी आणि ४ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाचे ५० हून अधिक जवान आणि अधिकारी ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नसून, सिलेंडर फुटल्याने ही भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें