यासेर उर्दू शाळेत रंगभरण स्पर्धा संपन्न.
समशेर खान.सेलु येथील गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळेत आज महामानव भारतरत्न संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य रंगभरण स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा न.प. सदस्य तथा अल्पसंख्यांक संस्थाचालक संघ परभणी चे अध्यक्ष पठाण रहीम खान ख़ैरुल्ला खान यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमधे शाळेतील 345 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चित्रांमधे रंगभरणाचे कार्य केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज़ खान, सय्यद ईमरान, सय्यद अज़ीम, सय्यद अमन आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें