शेतावरील आखाड्याचे कुलूप तोडून बैलजोडी चोरी. एक लाखाची बैल जोडी चोरी, सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

शेतावरील आखाड्याचे कुलूप तोडून बैलजोडी चोरी. एक लाखाची बैल जोडी चोरी, सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील घटना.

शेतावरील आखाड्याचे कुलूप तोडून बैलजोडी चोरी.


एक लाखाची बैल जोडी चोरी,

सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील घटना.

तीन वर्ष अगोदर याच शेतातून गेली होती बैल जोडी चोरी.


सेलू प्रतिनिधी.
समशेर खान.
सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील शेतकरी धोंडीराम तुकाराम आवटे यांच्या शेताच्या आखाड्यातून पत्राच्या रूम मधून कुलूप तोडून बैल जोडी चोरीची घटना 21 एप्रिल रात्री 11 ते 22 एप्रिल सकाळी 8 च्या वेळेत बैल जोडी चोरीची घटना घडली या घटनेच्या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी धोंडीराम तुकाराम आवटे यांच्या फिर्यादीवरून एक काळ्यारंगाच्या उभा शिंगाचा व दुसरा काळा व भूऱ्या रंगाचा उभ्या शिंगाचा असे दोन बैलजोड्या चे वर्णन आहे शेतमालक शेतावर आले नसल्याचे कारण बघून चोराने आखाड यावरील बंद पत्राचे रूमचे कुलूप तोडून दोन बैल जोड याची चोरी झाली गू.र.न. 92/18 याप्रमाणे कलम 379 नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास जमादार शेख मुजीब करीत आहेत या घटनेमुळे म्हाळसापुर सर्वच शेतकरी शेतामध्ये बैल जोडी ठेवण्यास भीत आहेत यामुळे येथे बैल जोडीचा घटना हमेशा होता असतात व या घटनेचा गुहासुद्धा दाखल करण्यात येतो पण तपास मात्र लागत नाही अशीही खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अगोदरच शेतकरी बोंड आळी मुळे त्रस्त असताना त्यामध्ये दुसरे संकट बैल जोडी चोरीचे घडले आहेत यामुळे धोंडीराम तुकाराम आवटे यांच्या शेतातील बैल जोडीचा शोध लागावा हीच इच्छा म्हाळसापुर  येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें