मानवत येथील डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२३: मानवत येथील डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने डॉ.निनांद दगडु यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी मंगल कार्यालय येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबियाकरिता योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाशल्यचिकित्सक जावेद अथर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन तहसिलदार नकुल वाघुंडे ,मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,वैद्यकीय अधिक्षक नरेद्र वर्मा,उपपोलीस निरिक्षक प्रविष्ट दिनकर ,अदमाने सर हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.नेञदिप दगडु यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच यावेळी व्यासपिठावरील मान्यवराचे शाल नारळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुबियांच्या आरोग्याची जबाबदारी डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टने घेतली असुन पुढिल एकावर्षासाठी शेतकऱ्यांचे कुटुबियांना दवाखान्यात बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा हि सामाजिक बाधिलकी म्हणुन मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या ७४ कुटुबियांना उपस्थीत मान्यवराचे हस्ते हमीकार्ड वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक जावेद अथर, तहसिलदार नकुल वाघुंडे व मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सामाजीक कार्याची भरभरुन प्रशंसा केली तसेच संस्थेचे सचीव निनांद दगडु याच्यां वाढदिवसानिमित्त मान्यवराचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुञसंचालन किशोर तुपसागर यांनी केले व प्रास्तविक सत्यशिल धबडगे यांनी केले तर आभार होगे सर यांनी मानले.या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठि संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गणेश मोरे,निनांद दगडु,विशाल कडतन,सचीन दगडु ,नितीन वेदपाठक यांनी परिश्रम घेतले.यावेळी शेतकरीसह नागरीक मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें