जिल्हा परिषद दावतपुर पहिलीच्या मुलांचा प्रवेश कार्यक्रम उत्साहात...
शे.सलिम.प्रतिनिधी : भोकरदन
जिल्हा परिषद दावतपूर येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी इयत्ता पहिली साठी विद्यार्थाना प्रवेश देण्यात आला या कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती भोकरदनचे गट समन्वयक एस. बी .नेव्हार, सरपंच नायबराव घायवट ,केंद्र प्रमुख बी. पी. सोळंके, विषय तज्ञ एस .जे. शेटे,केंद्रीय मुख्याध्यापक पी .ई. जाधव, शालेय समिती अध्यक्ष गजानन घायवट,रमेश घायवट,काकासाहेब घायवट,पोपटराव जोगदंडे यांनी केले यावेळी सर्व पालक उपस्थित होते सर्व प्रवेशित विध्यार्थाना सजवलेल्या बैलगाडी बसवून गावातून मिरवणूक काढली यावेळी व इंग्रजी व मराठी मुळाक्षरे असलेली तोरणपट्या,शब्द पट्या, मुलांनी हातात धरल्या होत्या शाळेतील काही विध्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत होते यावेळी गावातील स्त्री व पुरुष व केंद्रातील सहशिक्षक टेकाळे , दुबळगुंडे ,यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता यावेळी शाळेतील सर्व प्रवेशित विध्यार्थाना शाळेतर्फे वही,पेन,दप्तर,गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख बी. पी .सोळंके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जी .जी .जाधव, पी .एस .राठोड , श्रीमती जे .एस .लोहार यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें