भोकरदन येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम......
शे.सलिम.भोकरद/ प्रतिनिधी-
शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित भोकरदन केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त दिनांक ७ ते १३ एप्रिल या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त शनिवार पासून प्रारंभ झालेल्या या सप्ताह सोहळ्यातील सामुहिक गुरुचरित्र पारायणाला २५१ सेवेकरी सहभागी झाले आहे. यामध्ये महिला सेवेकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. या सप्ताह सोहळ्यात प. पु. गुरुमाऊली यांच्या आदेशाने व चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रहित, विश्वशांती व आतंकवादापासुन भारतभूमीच्या रक्षणासाठी दररोजच्या नित्यसेवेसह त्रिकाल आरती, स्वामी चरित्र, स्वामी जप माळ, दुर्गा सप्तशती, श्री मल्हारी सप्तशती पाठाचे वाचन यासह विवीध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी दिनांक १३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार असून, सकाळी महाआरती महानैवेद्यानंतर लगेचच सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, महाप्रसादाने सप्ताह सोहळा कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दरम्यान महाप्रसादाच्या कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो क्र. ०१ भोकरदन : श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरु असलेल्या गुरुचरित्र पारायणात सहभागी झालेले सेवेकरी. दुसऱ्या छायाचित्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें