महात्मा बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीया निमित्त ग्रंथदान.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा उपक्रम.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१८एप्रिल २०१८सोनपेठ शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विद्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीयाचे औचित्य साधूनसामाजीक एकतेचा संदेश देत विश्व-विद्यालयाच्यावतीने तालूक्यातील शाळांना भेट देण्यासाठी शाखा संचालीका मिरा बहेनजी यांनी ग्रंथ वाचन चळवळीस चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांच्याकडे ग्रंथदान केले. यावेळी मिरा बहेनजी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा उल्लेख करून अभ्यास व वाचनाने उज्वल भविष्य घडते असे मत व्यक्त केले. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व-विद्यालयाद्वारा चालविल्या जात असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देत, भविष्यात शहरातील बालकांसाठी वाचनालय स्थापन करन्याचा मनोदयही व्यक्त केला. या बहुमोल कार्यासाठी शहरवासीयांकडुन सहकार्याती अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुर्यकांत लोलगे, शैलेश महाजन, युवराज पोर, गणेश खेडकर, आदित्य खेडकर आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें