पालम शहरात सर्वधर्मीय व सर्व पक्षाच्या ऐतिहासिक भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अश्या घोषवाक्याणी शहर दुमदुमूले.
पालम (अनीस खुरेशी)
जम्मू काश्मिर राज्यातील कठुआ येथील आठ वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून कुरपणे तिची हत्या करण्यात आली.तसेच उन्नाव उत्तर प्रदेश व गुजरात येथील युवतीवर बलात्कार करून त्यांचे जिवन उध्वस्त केले.या तिन्ही घटनेचा तीव्र निषेध नोंदवुन संबधितावर जलदगतीने कठोर कार्यवाही करण्यात यावी व बलात्कारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात यावी नवीन कायदा करण्या यावा आदी विविध मागण्यांचे निवेदन दि.23 एप्रिल सोमवार रोजी पालम शहरातील सर्व धार्मियांतर्फे इतीहासीक महा मोर्चाचे आयोजन करून पालम तहसीलदार तेजस्वनी जाधव मार्फत शासनाला पालम शहरातील सर्वधर्मीय व सर्व पक्षाच्या वतीने देण्यात आले. मोर्चेची सुरूवात शहरातील पोलीस स्टेशन,हजरत टिपु सुलतान रह.चौक,पोस्ट ऑफिस, येथुन सकाळी 10:30 वाजता सुरूवात होऊन तहसील कार्यालयासमोरील मैदानावर पोहचुन तेथे जाहिर सभेत रूपांतर झाले तसेच विविध समाजातील प्रमुख वक्ताचे मनोगत व्यक्त करण्यात आले.पालम शहरातील सर्व धार्मिय समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली पालम पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें