सेलु तालुक्यातील पारडी जि.प.शाळेत जागतीक पुस्तक दिन साजरा.
अनवर पठान.दि.23/03/2018.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी ,तालुका सेलू ,जिल्हा परभणी येथे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कुरेशी सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जगन्नाथ राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाली जिल्हा रायगड व शाळेची सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला.
यावेळी प्रथम भारतरत्न 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ' प्रतिमेचे पूजन करण्यात आले कु.मनीषा राठोड हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमात अजय राठोड, महेश राठोड, या विद्यार्थ्यांनी पुस्तक दिना विषयी माहिती सादर केली.
जगन्नाथ राठोड यांनी पुस्तक दिनाच्या निमित्ताने बोलत असतांना विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजून दिले. पुस्तक विद्यार्थ्याचा आत्मा असतो, पुस्तकाच्या माध्यमातून आपण जगभरची भ्रमंती करू शकतो. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉ एपीजे अब्दुल कलाम, असे अनेक उदाहरण देऊन त्यांनी पुस्तकाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. वेळेअभावी अधिक माहिती मी सांगू शकत नाही पण पुढील वेळेस पुस्तकांच्या विषयावर मला बोलायला नक्की आवडेल. मी नक्की तुमच्याशी पुस्तकांविषयी हितगुज करेल असा शब्द त्यांनी दिला.
काजल राठोड या विद्यार्थिनीने *मला पुस्तक कशी आवडू लागली आहेत ,माझ्या स्वप्नात कशी पुस्तके येत आहे, पुस्तकांचे महत्त्व मी आई आणि वडिलांना किती समजावून सांगितलं, पुस्तक हाच माझा प्राण बनला आहे असे कौतुकाचे बोल ती बोलत होती. एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज ही आश्चर्य करणारीच होती* आपण सर्व खरच भाग्यवान आहोत. दररोज आपण पुस्तकांच्या सहवासामध्ये राहतो. खोटे बोलत नाहीत, कुणाला धोका देत नाहीयेत. अशा स्वच्छ मित्रांसोबत आपल्याला राहिला मिळतो. ही आनंदाची गोष्ट आहे.
मनीषाने पुस्तकांचे महत्त्व सांगत असताना, *गेल्या वर्षी मला उत्कृष्ट वाचक पुरस्कार मिळाला. व माझा आयुष्यच बदलून गेलं. आज माझ्याकडे 60 पुस्तकांचा संग्रह आहे. त्यातील 15 पुस्तकांचे वाचन मी केला आहे. या पुस्तकांचे वाचन करताना मला, वेगळ्या जगात गेल्यासारखा वाटत होतं* साळुंके सरांचं त्यांना सावलीत वाढवू नका हे पुस्तक वाचून तर मला खूप मोठी प्रेरणा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण या पुस्तकांना मला बोलायचं कसं, या गोष्टी समजल्या. *पूर्वी मी tv पहात होते पण पुस्तक वाचनाची गोडी जेव्हापासून लागली तेव्हापासून मी tv पाहन बंद केलं. आता मला पुस्तकांशिवाय करमत नाही. सुट्ट्यात खूप सारी पुस्तक वाचणार आहे*
राधा शेळके बोलताना म्हणाली, *"पुस्तक वाचन ही आयुष्याला मिळालेली सर्वात महान भेट आहे. त्यामुळे मित्र जोडले जातात आणि मित्रातून पुस्तके वाढत जातात. आपल्याला जर एखादा शब्द माहीत नसतो ते आपल्याला पुस्तकातून मिळतात. या जगात असा एकच मित्र असतो तो म्हणजे पुस्तक जो कधी कुणाशी धोका करत नाही. *आपल्याला तहान लागली की आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसं पुस्तक प्रेमी माणूस पुस्तकाशिवाय राहू शकत नाही. पुस्तकामध्ये छान छान विचार असतात पुस्तकांमध्ये एक सुंदर मन दडलेलं असतं. हे मन आपल्याला पुस्तकांकडे खेचतो. *पुस्तक विषय आला की डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विसरून कसे चालेल. भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर पुस्तक वाचक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण दिलं जातं. ही आपल्या भारत देशाची अभिमानाची गोष्ट आहे."*
असे अनेक अमूल्य विचार मांडत मुलांनी आजचा जागतिक दिन साजरा केला. वर्षभरात वाचलेल्या विविध पुस्तकांची उजळणी याप्रसंगी करता आली.
युवराज माने यांनी पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट करत असताना म्हणाले, *मुलांनो आईच्या कपाळावरील कुंकुमतिकाने आई किती सुंदर दिसते* त्याप्रमाणे पुस्तक वाचन हा तुमचा सुंदर दागिना आहे. *आईच्या कपाळावर लावलेलं कुंकू व त्यामुळे आपली आई किती सुंदर दिसते तसंच ज्या विद्यार्थ्यांचा वाचन चांगला आहे, जो विद्यार्थी पुस्तकांचे वाचन करतो .तो विद्यार्थी सर्वात सुंदर असतो. ज्यांना या जीवनात यशस्वी व्हायचं असेल त्यांनी पुस्तकांना आपला मित्र बनवा असे आव्हान याप्रसंगी त्यांनी केलं. पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक सारस्वतांची आपण जोडल्या गेलो . आपण अनेक माणसांशी भेटत आहोत. *पुस्तक रूपाने आपल्या घरी अनेक लेखक वास्तव्य करतात असंच मला वाटतं. “आज माझ्याकडे हजारो पुस्तकं आहेत म्हणजेच माझ्याकडे हजारो लेखक माझ्या घरी वास्तव्य करतात ” यासारखा दुसरा आनंद कशात नाही* असं त्यांनी पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं."
कार्यक्रमाचे आभार सुनिता राठोड हिने केले.
शेवटी मुलांनी आणलेल्या शिदोरिचा शिवानी लघें या मैत्रिणीच्या शेतात जाऊन मनसोक्त आस्वाद घेतला . जेवण करतानाही ही चिमुकली पुस्तकाविषयीचं चर्चा करत होती. निसर्गाच्या सानिध्यात पुस्तकांची गोष्ट करताना झाडे ,वेली पशु ,पक्षी ही आनंदी झालेच भास होत होता .जणू काही तीही सर्वजण पुस्तकाच्या गोष्टीच करत आहेत असं वाटू लागलं होतं.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें