मानवत तालुक्यात अवैधरित्या वाळुविक्रि करणाऱ्या दोन ट्रकटरवर कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

मानवत तालुक्यात अवैधरित्या वाळुविक्रि करणाऱ्या दोन ट्रकटरवर कारवाई.

मानवत तालुक्यात अवैधरित्या वाळुविक्रि करणाऱ्या दोन ट्रकटरवर  कारवाई.

तहसिलदार नकुल वाघुंडे यांच्या कारवाईने वाळुमाफियाचे धाबे दणाणले.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील मौजे वझुर व कुंभारी तांडा येथे महसुल प्रशासनाच्या वतीने अवैध वाळु वाहातुक करणाऱ्या दोन ट्रकटर दि.१२ एप्रिल  रोजी कर्तव्यदक्ष  तहसिलदार नकुल वाघुंडे यानी पकडुन वाहनावर कारवाई करत मानवत पोलीसांच्या स्वाधीन केले आहे यामुळे वाळुमाफियाचे धाबे दणाणले आहे.मानवत तालुक्यात गोदावरी नदिपाञातील वांगी येथील वाळु धक्यावर नियमबाह्य वाळुचा उपसा केल्याप्रकरणी नुक्तेच ठेकेदारावर महसुल प्रशासनाने कारवाई करत हा धक्का पुर्णत बंद केला आहे याचाच फायदा घेत तालुक्यातील वाळु माफियांनी राञीच्या वेळेस वाळु चोरुन विकण्याचा धंदा जोरात सुरु केला होता यातच  वझुर व कुंभारी तांडा येथे आवैध वाळु उपसा करुन विक्रि होत असल्याची माहिती मिळाल्याचे  आधारे कार्यदक्ष तहसिलदार नकुल वाघुंडे व तलाठी जाधव यांनी १२ एप्रिल रोजी राञीच्या ११:३० वाजता अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्या दोन ट्रकटर पकडुन त्याच्यांवर कारवाई करण्यासाठि मानवत पोलीसांच्या हवाले दोन्ही ट्रकटर देण्यात आले आहे.ट्रकटर वाल्यानी पावत्या दाखवल्या असुन त्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी दै.गाववाला शी बोलताना दिली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळु विक्रि करणाऱ्या वाळुमाफियाचे धाबे दणाणले आहे  यासाठी जनतेकडुन मागणी होत आहे की जिल्हाधिकारी साहेबानी नायबतहसिलदार  नकुल वाघुंडे यांच्याकडे असलेला प्रभारी तहसिलदार पद त्यांनाच कायमस्वरुपी मानवतच्या तहसिलदारपदी विराजमान करावे कारण मानवत तालुक्याला अशा कार्यदक्ष अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें