खासदार संजय जाधवांचा मंत्र्यांसह पुत्रावर प्रहार.....हु इज धीस राहुल ? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

खासदार संजय जाधवांचा मंत्र्यांसह पुत्रावर प्रहार.....हु इज धीस राहुल ?

खासदार संजय जाधवांचा मंत्र्यांसह पुत्रावर प्रहार.....हु इज धीस राहुल ?


 मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरही बहिष्कार!



परभणी :
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध आज जबरदस्त प्रहार केले . भाजपची जालन्याची पार्सल अशा शब्दात त्यांचा ऊल्लेख करत त्यांच्या मुलाच्या प्रशासकीय दादागिरीवरही खासदारांनी जबर हल्ले चढवले. मंत्री पुत्राची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि ही दादागिरी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची ही हकालपट्टी करण्यात यावी अशी जोरदार मागणीच त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्र्यां च्य पुत्राने घेतलेली कार्यालयात बैठक पूर्णपणे बेकादेशीर असून अधिकारांचा वापर करणे ही चूक असल्याचेही खासदार म्हणाले.

शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना खासदारांना आणि आमदारांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यां चा परभणीत कार्यक्रम घेतला जात आहे तो. अजिबात समर्थनीय नाही शिवसेनेच्या स्टाईलने याला उत्तर दिले जाईल असा गंभीर इशारा खासदारांनी दिला.

मुख्यमंत्र्यांचा परभणीतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार असून या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना खासदार बंडु जाधव यांनी आज दिला. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध त्यांनी जबरदस्त प्रहार केला.
स्वच्छता खात्याचा मंत्री असताना परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेली ढवळाढवळ अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पालकमंत्री शिवसेनेचे खासदार यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम घेतलाच कसा? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पाणीपुरवठा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्हाधिकारी शिवशंकर यांच्याविरुद्ध तुफानी कडाडून हल्ला केला. भाजपाचा कार्यक्रम की शासनाचा कार्यक्रम असा सवाल करून बंडु जाधव यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांना जबरदस्त घेरले. शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें