कठुआ,उन्नाव व सुरत येथे झालेल्या आत्याचारा विरोधात आडुळ ता.पैठण येथे कडकडित बंद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

कठुआ,उन्नाव व सुरत येथे झालेल्या आत्याचारा विरोधात आडुळ ता.पैठण येथे कडकडित बंद.

कठुआ,उन्नाव व सुरत येथे झालेल्या आत्याचारा विरोधात आडुळ ता.पैठण येथे कडकडित बंद.


प्रतिनिधी.
शे.मुनाफ.
आसिफावर व सुरत आणि उन्नाव येथे झालेल्या अत्याचाराविरोधात आडुळ ता.पैठण येथे बुधवार (ता.18) रोजी या गुन्ह्यातील आरोपी नाराधामांना फाशीची
शिक्षा व्हावी या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळुन निषेध करण्यात आला. सकाळी दहा वाजता असिफाला श्रध्दाजंली वाहुन संपुर्ण गावातुन मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, माजी
सरपंच हाजी मुक्तार मौलाना, राजेंद्र वाघ, शेख नासेर, राहुल बनकर, माजी सरपंच आशोक भावले, माजी सरपंच रुस्तुमराव बनकर, व्यापारी महासंघाचे
अध्यक्ष कल्याण वाघ, उपाध्यक्ष आसेफ पठाण, सुभाष मोघे, भाऊसाहेब पिवळ, दशरथ वाघ, हारुण पठाण, उपसरपंच राजु गोडसे, शेख मुस्तकिम, शेख अब्दुल
खालेकसेठ, शेख जहिर, शेषराव खंडागळे महाराज, मुजीब पठाण, कासम पठाण, ज्ञानेश्वर राठोड, बाबुभाई बागवान, शेख इलियास, अनिल मोरे, रामुनाना पिवळ, शिवलाल राठोड, दादाराव वाघ, प्रदिप कासलीवाल, यांच्यासह शालेय विद्यार्थी,

विद्यार्थींनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्च्याची सुरुवात स्टेट

बँक ऑफ इंडिया समोरुन इस्लामपुरा, बजरंग गल्ली, शिवशक्तीचौक, बारुदगल्ली, आंबेडकरनगर मार्गे बसस्थानकासमोरुन ग्राम पंचायत कार्यालयासमोर पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधळे, तलाठी राजेंद्र आठवले यांना येथील शालेय विद्यार्थींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारयासह सर्व समाजाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्च्यात सहभागी झालेल्या बांधवांना रामुनाना पिवळ यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.आज दिवसभर येथील सर्व दुकानी बंद आसल्याने
बाजारपेठेत शुकशुकाट होता.

फोटो कॅप्शन.                                                        आडुळ ता. पैठण येथे कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. दुसरया छायाचिञात निवेदन देतांना विद्यार्थी. तिसर्या छायाचिञात मोर्चात सहभागी झालेले सर्वपक्षिय पदाधिकारी (छायाचिञ शेख मुनाफ) 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें