‘हिरवं, कोवळ पान’ कविता संग्रहाचा 22 रोजी प्रकाशन सोहळा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

‘हिरवं, कोवळ पान’ कविता संग्रहाचा 22 रोजी प्रकाशन सोहळा

‘हिरवं, कोवळ पान’ कविता संग्रहाचा 22 रोजी  प्रकाशन सोहळा .

सेलु.प्रतिनिधी
समशेर खान.
सेलू येथील कवी सुरेश हिवाळे यांच्या ‘हिरवं कोवळ पान’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा परभणी येथील वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालय सांकृतिक सभागृहात उद्या रविवार, २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवि इंद्रजित भालेराव हे राहणार आहेत. या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी फ.मुं. शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमास जयराम खेडेकर, साहित्यिक डॉ आसाराम लोमटे, तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, बाबा कोटंबे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सह्याद्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें