बिहार,मध्य प्रदेशमध्ये पुन्हा तणाव; आरक्षणविरोधी बंदमुळे वातावरण पेटले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

बिहार,मध्य प्रदेशमध्ये पुन्हा तणाव; आरक्षणविरोधी बंदमुळे वातावरण पेटले.

बिहार,मध्य प्रदेशमध्ये पुन्हा तणाव; आरक्षणविरोधी बंदमुळे वातावरण पेटले.                                                                                     
Url
संग्रहित

जातीवर आधारीत आरक्षणाला विरोध करत बिहारमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. १० एप्रिलला देशभरात हा कथित बंद पुकारण्यात आला असून याबाबतचे मेसेज समाज माध्यमांवर गेले काही दिवस फिरत होते. याची ठिणगी बिहारमध्ये पडल्याचं चित्र बघायला मिळत असून तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आरा मध्ये पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचंही वृत्त पुढे येत आहे. आरा भागामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार तसंच दगडफेक केली आहे ज्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचे लोण पेटले असून आंदोलकांनी आराव्यतिरिक्त बेगुसराय आणि पाटण्यातही जाळपोळ केल्याचं समजतंय. आंदोलक हे आरक्षण हटाओ, देश बचाओच्या घोषणा देत असून त्यांना आवरणं पोलिसांना अवघड बनलं आहे. कैमूर मधील राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी जाम केला असून इथे भयंकर वाहतूक कोंडी झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें