सोनपेठ येथे महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.११एप्रिल २०१८
सोनपेठ शहर व तालुक्यात दि.११ एप्रिल बुधवार रोजी जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय कन्या शाळा, कै.राजाभाऊ कदम विद्यालय, जिजामाता पब्लिक स्कूल, युनिटी इंग्लिश स्कूल, व्हिजन इंग्लिश स्कूल, कै . र. व. महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद प्रशाला आदी ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
जि.प.मा.वि. येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विध्यार्थिनी सीमा पांढरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पूजा चव्हाण व प्रतीक्षा तुपसामिंद्रे तर महात्मा फुले यांची वेशभूषा शिवम हुके आदींनी प्रथम प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, स्वागत गीत, विध्यार्थी मुलं, मुली यांची भाषण यावेळी सहशिक्षक सर्वश्री देशपांडे व राठोड, मुख्याध्यापक सुमित लांडे, धिवार, गोरवे, संदिप लष्करे, सज्जनशेटी व रविकुमार स्वामी आदींची उपस्थिती होती, सूत्रसंचालन संध्या सूर्यवंशी व रुकसार शेख यांनी केले.
तालुक्यातील विटा (खु) येथिल जील्हा परिषद प्राथमिक शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुन तुपसमिंद्रे प्रमुख पाहुणे बार्टिचे समतादुत अंकुश रसाळ, पत्रकार संपादक किरन स्वामी, शिक्षण प्रेमी जगन्नाथ कोलते पाटील, अशोक तुपसमिंद्रे व मुख्याध्यापक शेख यांची उपस्थिती होती. प्रथम महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करन्यात आले, मुलींनी स्वागत गित सादर केले, विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक शेख यांनी तर मनोगत किरन स्वामी, अंकुश रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बार्टि तर्फे ग्रंथदान करण्यात आले. मुख्याध्यापक शेख सर तसेच समतादुत अंकुश रसाळ यांच्या हस्ते किरन स्वामी यांना शेतकऱ्याचे आसुड हा ग्रंथ भेट देन्यात आला. अध्यक्षीय समारोप अरुण तुपसमिंद्रे यांनी केले. शेवट वंदे मातरम गिताने केला. सुत्रसंचालन बनाळे सर तर आभार भिसे सर यांनी मानले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें