क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे अनावरण - नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे हस्ते उदघाटन ;
सिल्लोड (प्रतिनिधी शेख कलिम )दि 12
सिल्लोड - रजाळवाडी येथेक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे अनावरण नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते करण्यात आले.महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्तचे औचित्य साधून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले चौक स्तंभास तसेच प्रतिमेस नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाची तत्कालिन परिस्थिती पाहता स्रियांच्या शिक्षणाचे कार्य हाती घेतले. समाजातील अनिष्ट रुढी,परंपरा,चालीरीती,वर्णव्यवस्था,जाती व्यवस्था नष्ट व्हावी व समाजात मानवता,बंधूभाव नांदावा यासाठी अविरतपणे प्रयत्न केले असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
अशा भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड ,शहर पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख,नगरसेवक सुनील दुधे,सुनिल मिरकर, कुणाल सहारे,रईस मुजावर पठाण,राजू बन्सोड,सखाराम अहिरे, अमित आरके,मतिन देशमुख,राजेश्वर आरके,मनोहर आरके, बाजीराव दुधे,रामदास दुधे,अमोल कुदळ,विशाल कुदळ, जगन्नाथ कुदळ,जगन आरके,विठ्ठल दुधे,अनिल दुधे, फईम पठाण,राजू साळवे,रामदास दुधे,दामोधर कुदळ,सुधाकर कुदळ, आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें