परभणी जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे आज एक दिवसीय उपोषनाचे आयोजन.
वि.प्रतिनिधी.समशेर खान
मा.खा.अशोकरावजी चव्हाण साहेब अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशकॉंग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीत एक दिवस उपोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
सदरील उपोषण हे
भाजप सरकारच्या शेतकरी, दलित, बहुजन समाज विरोधी धोरण, जातीय व सामाजीक सलोखा बिघडवने या कारणाने आहे .तरी
उपोषण धोरणाच्या विविध मागण्या ह्या
1) देशभरात सामाजिक सलोखा
ठेवण्या संदर्भात एक दिवस उपोषण ,
2) महसुल व कृषि विभाग यांची आणेवारी 50%पेक्षा कमी असुन देखील रिलायन्स विमा कंपनीने
विमा मंजूर केला नाही, तो शासकीय निकशया प्रमाणे सोयाबीन व कापूस पिकांना विमा मंजुर करण्यात यावा,
3) ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग बंद करण्यात यावी,
4) पीककर्ज त्वरीत वाटप करण्यात यावे,
5) सन 2014/2015 प्रमाणे परभणी जिल्ह्य़ा दुष्काळ जाहीर करून अनुदान व सवलती देण्यात याव्यात,
6) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक व ट्युशन्स फिस माफ करण्यात यावी.
या व इतर मागण्या संदर्भात वरिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व आजी माजी पदअधिकारी , सन्मानीय जेष्ठ नेते , जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी , कामगार , सहयोगी संघटना , कॉंग्रेस सदस्य कार्यकर्ते व कॉंग्रेस विचाराशी जोडलेले सर्व सन्मानीय नागरीक यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे.
असे आवाहन माजी मंत्री मा.सुरेशराव वरपूडकर साहेब , अध्यक्ष परभणी जिल्हा कॉंग्रेस कमिटी
यानी केल आहे.
दिनांक - 9 एप्रिल 2018
वेळ : सकाळी 10 वाजता
स्थळ: शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील जागेत (जिल्हाधिकारी कार्यालय च्या बाजूस) परभणी.)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें