भाजपाच्या कमळाबाईला असे हद्दपार करा की,२५ वर्ष तरी या कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये -धनंजय मुंडे.
आज सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसादच भाजपाला झोपू देत नाहीय.आत्ता भाजपाच्या कमळाबाईला असे हद्दपार करुया की,२५ वर्ष तरी या कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत केले.
टेंभुर्णीच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून पहिली सभा सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये प्रचंड उत्साहात आणि रणरणत्या उन्हात पार पडली.
सभेच्या सुरुवातीला आमदार बबनराव शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,खासदार विजयसिंह मोहितेपाटील,युवक अध्यक्ष संग्रामकोते पाटील यांनी आपले विचार मांडले.
या सभेला खासदार विजयसिंह मोहितेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्रामकोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे, जि.प.सदस्य विक्रांत पाटील, उमेश पाटील, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,आदींसह टेंभुर्णी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें