बलात्कारप्रकरण स्वयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापुला जन्मठेपेची शिक्षा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 अप्रैल 2018

बलात्कारप्रकरण स्वयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापुला जन्मठेपेची शिक्षा.

बलात्कारप्रकरण स्वयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापुला जन्मठेपेची शिक्षा.

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टाने बुधवारी (ता. 25एप्रिल)रोजी दोषी ठरवत आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टामध्ये आसारामला रडू कोसळले. जोधपूर मध्यवर्ती कारागृह कोर्टाने आसाराम बापूसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे तर दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम, शिल्पी व शरदचंद्र या तिघांना कोर्टाने दोषी ठरवंल आहे. प्रकाश व शिवा या दोघांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर शिल्पी आणि शरद या दोषींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाने समाधानी आहोत. आमच्या लढल्याला यश आलं असून आमच्या बाजूने निर्णय आला आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.
कोर्टाच्या निर्णयावर आम्ही आमच्या टीम कडून कायदेशीर सल्ला घेऊनच पुढची दिशा ठरवणार आहोत. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं आसारामच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी म्हटलं आहे.
31 ऑगस्ट 2013 पासून आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहे. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती. इंदूरहून अटक झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आलं. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आसाराम बापूचं वय सध्या 77 आहे. पॉक्सो व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आसाराम बापूवर गुन्हे दाखल आहे. तुरुंगात गेल्यापासून त्याने 12वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. पण आसारामला जामीन मिळाला नाही. 12 पैकी सहा जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळले, तीन अर्ज राजस्थान हाय कोर्टाने फेटाळले आणि तीन सुप्रीम कोर्टाने फेटाळले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें